Saturday, July 5, 2014

मारिया शेरापोवा आणि सचिन तेंडुलकर

मारिया शेरापोवा आणि सचिन तेंडुलकर :

मारिया ने एक विधान केल की तिला सचिन तेंडुलकर कोण ते माहीत नाही आणि बहुतेक भारतीयांचा ईगो दुखावला गेला. सचिन कोण आहे ह्याचे फोटोज आणि त्याचे रेकॉर्ड्स मारिया ला टॅग करून सोशल मीडीया वर पसरायला लागले.

२-३ दिवस सगळे ह्याचीच चर्चा करत होते जणू काही बाकी काही करायला शिल्लक नव्हत. मुळात ती रशिया मधली, तिचा खेळ टेनिस, केवळ सचिन तेंडुलकर विमबल्डन बघायला जातो म्हणून तिला तो माहीत असायला पाहिजे हा अट्टहास का ?

ह्या वर सचिन तेंडुलकर काहीही न बोलता आपले काम म्हणजेच क्रिकेट खेळतो आहे, आणि आपण मात्र काम धंदा सोडून मारिया ला सांगतोय सचिन कोण आहे.

आणि जे बोलत आहेत त्यांना बहुदा रशिया मधे खेळले जाणारे सगळे खेळ आणि खेळाडू माहीत आहेत.

आपणच जगाला दाखवून देतो की आपण कोणत्या गोष्टींना किती महत्व देतो आणि आपल्याकडे कशा साठी किती वेळ आहे आणि आपण काय विचार करतो.

अनुपम भाटवडेकर 

No comments: