Sunday, January 1, 2012

Data Transfer

डेटा ट्रान्स्फर: हल्ली आपल्या सगळ्यांनाच डेटा ट्रान्स्फर ची गरज भासते, कारण आपल्याला आपल्या फोन वरचा डेटा आपल्या PC वर हवा असतो तर PC मधला काही डेटा आपल्या mobile वर हवा असतो . डेटा म्हणजे अगदी काहीही असू शकतो ,जसं कि application, गेम, गाण, फोटो,video file अगदी तुमचं ऑफिस मधलं महत्वाचं document किंवा presentation सुद्धा. डेटा ट्रान्स्फर चे प्रकार, Mobile to Mobile: Mobile to mobile डेटा ट्रान्स्फर करायला bluetooth हे सगळ्यात reliable टूल आहे. ज्या मुळे तुम्ही गाणी, तुमचे contacts अगदी तुम्ही save केलेली काही documents सुद्धा share करू शकता. टिप्स for Mobile to mobile data transfer: आपल्या mobile चे bluetooth गरज नसेल तेव्हा बंद ठेवा. अनोळखी व्यक्तींकडून आलेली file/data घेऊ नका. Mobile to PC and PC to Mobile: Mobile आणि PC मार्फत डेटा ट्रान्स्फर करायला प्रत्येक फोन बरोबर एक डेटा कॉर्ड आणि supporting software दिले जाते, जे फोन models नुसार बदलू हि शकते. ह्या कॉर्ड द्वारे तुम्ही तुमच्या फोन मधल्या files तुमच्या PC वर घेऊ शकता किवा PC वरच्या files/data तुमच्या mobile मध्ये घेऊ शकता. Tips to transfer data between PC and mobile: तुमच्या mobile phone आणि PC मध्ये updated software आहे कि नाही ते तपासा. तुमच्या फोन वरची file स्कॅन न करता तुमच्या PC वर घेऊ नका, तसंच scan न करता file तुमच्या PC वरून mobile मध्ये घेऊ नका. Data transfer karaychi paddhat: सगळ्यात पहिले तुमच्या mobile बरोबर आलेले software तुमच्या PC मध्ये install करा आणि instructions follow करा, ज्या मुळे तुमच्या PC var तुमचा phone install होईल आणि पुढच्या वेळे पासून तुम्हाला तुमचा phone सहज connect करता येईल. एकदा तुमचा phone connect झाला कि तुमच्या phone चे software तुम्हाला डेटा ट्रान्स्फर करू देते. नाहीतर तुम्ही अगदी Windows Explorer ओपन करून सुद्धा डेटा ट्रान्स्फर करू शकता. पण मग तो तुम्हाला कदाचित तुमच्या phone मध्ये नक्की कुठे आहे तो शोधावा लागू शकतो . Sync option in Smart Phones: Apple मध्ये Itunes ने तर Nokia मध्ये Ovi Application मुळे तुमचे फोटोस ,sms आणि contacts sync होतात. तसंच प्रत्येक फोन ची आपली आपली softwares आहेत. Android फोन मधला सगळ्यात मोठा advantage आहे कि तुमचे contacts autosync होतात, म्हणजेच जर तुम्ही तुमचे contacts फोन मध्ये update केलेत तर ते internet connection चालू असेल तर लगेच तुमच्या google contacts मध्ये update होतात आणि जर तुम्ही तुमच्या google contacts मध्ये update केलेत तर तुमच्या phone मध्ये update होतात. दोन दोन ठिकाणी update करायची गरज नाही. आणि त्यातून ते तुमच्या online account मध्ये save असल्यामुळे तुम्ही तुमचा फोन जवळ नसतानाही तुमच्या google account मधून एखादा number शोधून call करू शकता. त्यामुळे phone जर कधी विसरलात तर google account तुमची diary म्हणून काम करू शकत. Android फोन मध्ये picasa photo album सुद्धा sync होतात, ज्या मुळे तुमचे फोटो तुम्ही तुमच्या mobile वरून internet द्वारा कधीही बघू शकता. त्या मुळे तुम्हाला तुमच्या फोन वर ते वेगळे copy करायची गरज नाही. Android phone मध्ये SMS back up चा पण एक applicaiton आहे, जे तुम्हाला आलेले sms gmail शी sync करते. ह्या मुळे तुम्हाला आलेले bill payment alerts, credit card transactions, म्हन्तावाचे sms कायम तुमच्या कडे store राहतील आणि तुम्ही ते तुमच्या gmail account मध्ये शोधू पण शकता. Smart phones च्या ह्या स्मार्ट sync option मुळे आपला किती तरी वेळ वाचतो आहे हे मात्र नक्की