Thursday, December 22, 2011
ओंनलाइन चा जमाना : (Jara Damana Ghya in MT)
हल्ली सगळ ओनलाइन : मित्र/ मैत्रिणी ओनलाइन, गप्पा ओनलाइन, रुसवे फुगवे ओनलाइन, भेटी गाठी ओनलाइन, प्रेम ओनलाइन, अगदी लग्न पत्रिका आणि events सुद्धा ओनलाइन,
मग ह्या सगळ्या मध्ये शोप्पिंग आणि गिफ्ट्स सुद्धा ओनलाइन. जवळपास सगळी bill payments ओनलाइन भरण्याची सुद्धा हल्ली सोय आहे. कुठे कोणाला वेळ आहे रांगेत थांबायला आणि समोरच्या ची वाक्ये ऐकायला, सुट्टे पैसे द्या, हि नोटे चालणार नाही अशी काही कटकटच नाही.
पण असे व्यवहार करताना काही गोष्टीची खास काळजी घ्यावी लागते, कारण नाहीतर हि सोयच गैरसोय होते आणि मग काय करावे काही कळत नाही.
तरीही थोडी काळजी घेतल्यास हि सोय खूपच लाभदायक आहे. थोड्या स्वानुभवाने व इतर माध्यमातून मिळालेल्या टिप्स शेअर करत आहे.
ओनलाइन शोप्पिंग टिप्स :
१) शोप्पिंग करताना ओळखीच्या साइट्स वरून शोप्पिंग करा, जस कि indiatimes वगैरे. जेणे करून काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल आणि आपली तक्रार नोंदवता येईल.
२) कोणत्याही साईट वरून शोप्पिंग करताना खाली lock symbol आहे कि नाही ह्याची खात्री करा आणि payment करताना आपल्या browser वर https आहे ह्याची खात्री करा जे तुम्हाला तुमच transaction secured आहे हे दाखवत
३) कोणतीही शोप्पिंग साईट तुमची जन्मतारीख किवा तुमची अन्य माहिती मागत नाही. पण जर तुमची जन्मतारीख आणि तुमचा क्रेडीट/डेबिट कार्ड नुंबर जर कोणाला मिळाला तर ते कॉम्बीनेशन करून तुमच कार्ड वापरायचा
प्रयत्न करू शकतात.
४) आपले क्रेडीट आणि बँक statements चेक करत राहा आणि कोणतेही अन्य चार्जेस नाही आहेत ना हे पडताळा.
५) तुमचा कॉम्पुटरवर updated anti virus आणि latest operating system updates installed आहेत ह्याची खात्री करा, ज्या मुळे तुमचा कॉम्पुटर जास्ती secure राहतो.
६) आपला password कोणाला सहज कळेल असा नसावा. तसाच तो strong असावा.
७) शक्यतो बाहेरच्या machines वरून online transaction करणे टाळावे.
८) आपले wifi network password protected ठेवावे.
ओनलाइन बँकिंग टिप्स:
१) नेहमी बँकेच्या साईट वर नवीन लिंक ओपेन करून जावे.
२) मैल मध्ये आलेली लिंक ओपेन करू नये. आणि तशी कोणती लिंक आल्यास बँकेला कळवावे.
३) बँक कधीही तुमची माहिती परत मागत नाही. तुम्हाला जरी असा कोणता मैल आला तरी ती माहिती बँकेत जाऊन द्यावी आणि त्या मैल वरून माहिती देऊ नये.
४) बँकेची साईट सुद्धा https वर ओपन होत आहे ना हे बघावे.
५) आपला mobile number register असल्यास आपल्याला ठराविक रकमेच्या transactions साठी sms alert येऊ शकतात.
६) बँक statement जर काही वेगळे आढळले तर लगेच बँकेशी संपर्क साधावा.
७) Online बँकिंग वापरून झाल्यावर account नेहमी logout करावे.
वरील टिप्स लक्षात घेऊन जर आपण online shopping आणि net banking वापरले तर आपल जीवन नक्कीच थोडं सुखकारक होईल आणि आपला अमूल्य वेळही वाचेल ... नाही का ?
Thursday, November 24, 2011
कसे वापरावे फेसबुक :
कसे वापरावे फेसबुक :
हल्ली जवळपास सगळीच माहिती आपल्याला फेसबुक किवा अन्य social networking sites मार्फत कळते.
ह्या मध्ये अगदी भरवशाची काही माध्यमे असतात जसे कि वृत्तपत्राची असलेली accounts .. ज्या मध्ये खात्री केल्याशिवाय बातमी पोस्ट होत नाही
तर दुसरीकडे अगदी आपल्या friendlist पैकी कोणीतरी पोस्ट केलेली माहिती. हि माहिती खरी आहे कि नाही हे आपण बघत नाही. काही वेळेला अशी पोस्ट शेअर करण्याचा हेतू फक्त मनोरंजन असतो पण हाच कधीकधी खूप तापदायक ठरतो.
रा-१ चे फ्री t-shirts, फ्री गिफ्ट्स, shocking videos, आपले प्रोफाइल कोणी बघितले आहे, अशा भरपूर लिनक्स पोस्ट होत असतात. नकळत आपण त्यावर क्लिक करतो आणि ती आपल्या सगळ्या friends च्या वोल वर पोस्ट होते आणि मग आपल्याला कळत कि हि एक spam link आहे.
हे लक्षात आल्यावर मनात प्रश्न येतो कि हे सगळ कस थांबवायचं किवा फेसबुक वापरताना काय काय काळजी घ्यायची.
१) जर आपल्या account मधून unknown links पोस्ट होत असतील तर Account Security मधून password बदलावा आणि secure browsing enable करायचं.
२) कोणतीही माहित नसलेली लिंक पोस्ट न करणे ... avoid links which says ... who visited your profile or who has been stalking your profile.
3) फेसबुक मधून आलेल्या एमैल मधून attachment उघडू नका अगदी flash player update आला तरी सुद्धा. कारण हि लिंक खोटी सुद्धा असू शकते आणि तुमच account किवा तुमचा PC affect होऊ शकतो.
४) फेसबुक मधून आलेल्या Please send money एमैल scam la बळी पडू नका आणि असा message लगेच काढून टाका.
५) जर तुम्हाला कोणती लिंक suspicious वाटली तर report spam करा जेणे करून फेसबुक team त्यावर लक्ष ठेवून गरज पडल्यास योग्य ती कारवाई करेल.
ह्या शिवाय काही रोजच्या इंटरनेट संबंधी tips:
१) आपल्या PC शिवाय अन्य कुठेही इंटरनेट वापरताना आपले account sign out करायला विसरू नका.
२) आपला password बाहेरच्या machines वर save करू नका.
३) शक्यतो बाहेरच्या machines वरून online transactions करणे टाळा.
४) online transactions करताना शक्यतो virtual keyboard चा वापर करा ज्या मुळे तुमचा credit/debit card number कुठेही स्टोर होत नाही आणि त्यामुळे त्याचा गैरवापर व्हायची शक्यता कमी होते.
५) आपले passwords aani अन्य महत्वाची माहिती कोणाबरोबरही share करू नका ज्या माहिती द्वारे कोणी तुमच्या account चा गैरवापर करू शकेल.
६) आपल्या spam email मध्ये आलेल्या कोणत्याही लिंक वर जाऊ नका. खास करून बँकेच्या. कारण त्या द्वारे तुम्ही तुमची माहिती समोरच्याला देऊ शकता आणि ज्या मुळे त्याला तुमच्या bank account ला access मिळू शकतो.
Subscribe to:
Posts (Atom)