Thursday, November 24, 2011

कसे वापरावे फेसबुक :

कसे वापरावे फेसबुक : हल्ली जवळपास सगळीच माहिती आपल्याला फेसबुक किवा अन्य social networking sites मार्फत कळते. ह्या मध्ये अगदी भरवशाची काही माध्यमे असतात जसे कि वृत्तपत्राची असलेली accounts .. ज्या मध्ये खात्री केल्याशिवाय बातमी पोस्ट होत नाही तर दुसरीकडे अगदी आपल्या friendlist पैकी कोणीतरी पोस्ट केलेली माहिती. हि माहिती खरी आहे कि नाही हे आपण बघत नाही. काही वेळेला अशी पोस्ट शेअर करण्याचा हेतू फक्त मनोरंजन असतो पण हाच कधीकधी खूप तापदायक ठरतो. रा-१ चे फ्री t-shirts, फ्री गिफ्ट्स, shocking videos, आपले प्रोफाइल कोणी बघितले आहे, अशा भरपूर लिनक्स पोस्ट होत असतात. नकळत आपण त्यावर क्लिक करतो आणि ती आपल्या सगळ्या friends च्या वोल वर पोस्ट होते आणि मग आपल्याला कळत कि हि एक spam link आहे. हे लक्षात आल्यावर मनात प्रश्न येतो कि हे सगळ कस थांबवायचं किवा फेसबुक वापरताना काय काय काळजी घ्यायची. १) जर आपल्या account मधून unknown links पोस्ट होत असतील तर Account Security मधून password बदलावा आणि secure browsing enable करायचं. २) कोणतीही माहित नसलेली लिंक पोस्ट न करणे ... avoid links which says ... who visited your profile or who has been stalking your profile. 3) फेसबुक मधून आलेल्या एमैल मधून attachment उघडू नका अगदी flash player update आला तरी सुद्धा. कारण हि लिंक खोटी सुद्धा असू शकते आणि तुमच account किवा तुमचा PC affect होऊ शकतो. ४) फेसबुक मधून आलेल्या Please send money एमैल scam la बळी पडू नका आणि असा message लगेच काढून टाका. ५) जर तुम्हाला कोणती लिंक suspicious वाटली तर report spam करा जेणे करून फेसबुक team त्यावर लक्ष ठेवून गरज पडल्यास योग्य ती कारवाई करेल. ह्या शिवाय काही रोजच्या इंटरनेट संबंधी tips: १) आपल्या PC शिवाय अन्य कुठेही इंटरनेट वापरताना आपले account sign out करायला विसरू नका. २) आपला password बाहेरच्या machines वर save करू नका. ३) शक्यतो बाहेरच्या machines वरून online transactions करणे टाळा. ४) online transactions करताना शक्यतो virtual keyboard चा वापर करा ज्या मुळे तुमचा credit/debit card number कुठेही स्टोर होत नाही आणि त्यामुळे त्याचा गैरवापर व्हायची शक्यता कमी होते. ५) आपले passwords aani अन्य महत्वाची माहिती कोणाबरोबरही share करू नका ज्या माहिती द्वारे कोणी तुमच्या account चा गैरवापर करू शकेल. ६) आपल्या spam email मध्ये आलेल्या कोणत्याही लिंक वर जाऊ नका. खास करून बँकेच्या. कारण त्या द्वारे तुम्ही तुमची माहिती समोरच्याला देऊ शकता आणि ज्या मुळे त्याला तुमच्या bank account ला access मिळू शकतो.